Jayant Patil 
सांगली

Jayant Patil : अशा प्रकारचा विमान अपघात मी यापूर्वी कधीही पाहिला नाही

अजित पवार यांच्या विमान अपघातावर जयंत पाटील यांचे वक्तव्य

पुढारी वृत्तसेवा

सांगली : बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा ज्या पध्दतीने अपघात झाला, असा अपघात मी यापूर्वी कधी पाहिलेला नाही. धावपट्टीला धडकून विमान अपघात एकवेळ समजू शकतो, पण हवेत गरगर फिरून विमान खाली पडणे, हा अपघात कसा झाला, हे मला समजले नाही, असे वक्तव्य आ. जयंत पाटील यांनी केले.

ते म्हणाले, विमानाचा नेमका अपघात कसा झाला, हे ब्लॅक बॉक्समुले समजेल. ब्लॅक बॉक्समधून सर्व सत्य बाहेर येईल. विमान धावपट्टीला धडकले आणि त्याचा अपघात झाला, तर आपण समजू शकतो. पण हे विमान हवेतून गरगर फिरून खाली पडले, हे कसे घडले मला काही कळाले नाही. मी काही त्यात एक्स्पर्ट नाही. त्यामुळे तज्ज्ञाचे मत महत्त्वाचे आहे. शेवटच्याक्षणी पायलटचे कोणते संभाषण झाले आहे, हे आपल्याला ब्लॅक बॉक्सवरून कळेल, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT