सांगली : मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका पोलिस कर्मचाऱ्याने आंदोलक विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
"पोलिस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज सहज उपलब्ध होतातच कुठून?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित करत संबंधित कर्मचाऱ्यावर तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली.
ते म्हणाले, एखादा पोलिस कर्मचारी विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असेल, तर त्याचा अर्थ त्याला ड्रग्ज सहज उपलब्ध होतात. ही अत्यंत गंभीर बाब असून अशा पोलिसांचा तातडीने बंदोबस्त केला पाहिजे.