सांगली : ‌‘पुढारी ॲग््राीपंढरी‌’ कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ करताना आ. जयंत पाटील, सोबत दैनिक ‌‘पुढारी‌’चे कार्यकारी संपादक विजय जाधव, ऑर्बिटचे दीपक राजमाने, सोन रूपमचे विजय नक्षीकर, अ हेवनचे राजेंद्र बुगडे, कन्हैया ॲग््राोचे दीपक चव्हाण, संजय बजाज, शेखर माने व इतर. ( छाया : सचिन सुतार)  
सांगली

Jayant Patil : दैनिक ‌‘पुढारी‌’ने नवे तंत्र, नवे प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले

आ. जयंत पाटील यांची भावना; ‌‘पुढारी ॲग्रीपंढरी‌’ कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

सांगली : दैनिक ‌‘पुढारी‌’ने वेगवेगळ्या क्षेत्रांसोबत कृषी क्षेत्रातही पुढाकार घेऊन ‌‘पुढारी ॲग्रीपंढरी‌’ प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतीतील नवनवीन प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. या प्रदर्शनामधून शेतकऱ्यांच्या नव्या पिढीला अत्याधुनिक शेती तंत्राची माहिती होत आहे, ते सजग होत आहेत, अशी भावना माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी सांगलीत दै. ‌‘पुढारी‌’ माध्यम समूह आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‌‘पुढारी ॲग््राीपंढरी‌’ हे भव्य कृषी प्रदर्शन शुक्रवारपासून सुरू झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन आ. जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. ऑर्बिट क्रॉप मायक्रो न्युट्रीएंट हे या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून अ हेवन हॉलिडेज हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. कन्हैया ॲग्रो आणि बी.जी. चितळे डेअरी हे सहप्रायोजक आहे. तर सोनरुपम जेम्स ॲन्ड ज्वेलरी प्रदर्शनाचे गिफ्ट पार्टनर आहे. प्रदर्शनास राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय विकासमंडळ यांचे सहकार्य लाभले आहे.

उद्घाटन समारंभास ऑर्बिट क्रॉप मायक्रो न्यूट्रिएंट्‌‍सचे दीपक राजमाने, अ हेवन हॉलिडेजचे चेअरमन राजेंद्र बुगडे, बी. जी. चितळे डेअरीचे संचालक मकरंद चितळे, कन्हैया ॲग््राोचे प्रॉडक्शन मॅनेजर दीपक चव्हाण, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्चना शिंदे आणि सोनरूपम जेम्स अँड ज्वेलरीचे विभागीय व्यवस्थापक विजय नक्षीकर हे उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले, जग वेगाने बदलत असून नवे तंत्र पोहोचवण्याचे प्रयत्न वाढले आहेत. कृत्रिम बुध्दिमत्ता अर्थात एआय चा वापर केल्याने उत्पादनात वाढ होऊ शकते. पण कोणतेही तंत्र वापरताना, अगोदर ते वापरलेल्या दुसऱ्याचे काय होतेय, हे बघण्याची मानसिकता आहे. भांडवल कमी असल्यामुळे शेतकरी धोका पत्करत नाहीत. पण शेतकऱ्याची पुढची पिढी साक्षर आहे. त्यांच्यासाठी ‌‘पुढारी ॲग््राीपंढरी‌’सारखे प्रदर्शन मार्गदर्शक ठरेल, असे त्यांनी सांगितले.

दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक विजय जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करताना जाधव यांनी, राजसत्ता आणि शेतकरी यांच्यात मोठी दरी पडल्याचे सांगून, ती कमी करण्याची मानसिकता नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट झाल्याचे स्पष्ट केले. ही दरी कमी करण्याचे काम दैनिक पुढारी अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून करत असल्याचे त्यांनी सांगितले. विकासाच्या दिशा चुकत आहेत का? धोरणांच्या पुनर्मांडणीची गरज आहे का? असे सवाल करून, केवळ कर्जमाफी करण्यापेक्षा शेतीला नव्या तंत्राची जोड दिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. आभार शाखा व्यवस्थापक युवराज पानारी यांनी मानले. यावेळी रिजनल मॅनेजर (स्पेशल इनिशिएटिव्ह) बाळासाहेब नागरगोजे, वरिष्ठ व्यवस्थापक (इव्हेंट) राहुल शिंगणापूरकर, जाहिरात व्यवस्थापक प्रशांत कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर, तसेच जिल्हाभरातून आलेले शेतकरी उपस्थित होते.

बहरलेल्या पीक प्लॉट्‌‍सचे जयंतरावांनी केले कौतुक

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली मशागत, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संतुलित पोषणमूल्यांच्या जोरावर 75 पेक्षा जास्त प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या आणि फुलांचे प्लॉट्‌‍स आता पूर्ण बहरात आले आहेत. आमदार पाटील यांनी या प्लॉट्‌‍सना भेट देऊन कौतुक करून काही सूचनाही केल्या.

कराराने संरक्षण संपेल : आ. जयंत पाटील

अमेरिकेसोबत केंद्र सरकारने जेव्हा करार केला, तेव्हाच भारतातील शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची भूमिकाही सरकारने सोडून दिली. आपला शेतकरी आणि अमेरिकेचा शेतकरी, इथले तंत्र आणि तिथले तंत्र यात जमीन-अस्मानाचा प्रश्न असताना, आपली आणि त्यांची तुलना कशी होऊ शकते? आपला शेतकरी स्पर्धेला कसे तोंड देणार? असे सवाल करून, हा करार झाला तर भारतातील शेतकऱ्यांचे सारे संरक्षणच संपणार आहे. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? असा खोचक सवालही माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT