MLA Jayant Patil File Photo
सांगली

Jayant Patil : निधी वाटपाचे गटनिहाय नियोजन करा

आ. जयंत पाटील ः शिक्षकांच्या शिकवणीचे मूल्यमापन करा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी आहेत. त्यामुळे गटनिहाय निधी वाटपाचे नियोजन करा, असा सल्ला आमदार जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. तसेच मॉडेल स्कूलमुळे शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या. आता गुणवत्ता वाढवा, शिक्षकांच्या शिकवणीचे मूल्यमापन करा, असा सल्लाही दिला.

जिल्हा परिषदेमध्ये बुधवारी अध्यक्ष संगीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, सभापती पृथ्वीराज पाटील, सभापती स्नेहल मोरे, सभापती दादासाहेब कोळेकर, सभापती सावित्री रवी-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव आदी उपस्थित होते. बैठकीत घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे हप्ते थकले असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर योग्य ती आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आली. लाभार्थ्यांना योजनांचे पैसे वेळेत मिळावेत, यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी.

तालुकानिहाय महिला मेळावा घ्या

‌‘उमेद‌’ अभियानांतर्गत महिला बचत गटांना अधिक प्रोत्साहन द्यावे, या योजनांचा लाभ तळा-गाळातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने पदाधिकाऱ्यांशी समन्वय राखून काम करावे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठीही नियोजन करा, असेही आ. पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT