Accident Pudhari
सांगली

Jat road accident: जत येथे दुचाकी अपघातात परप्रांतीयाचा मृत्यू; एक जखमी

भरधाव दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात एका 23 वर्षीय परप्रांतीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला

पुढारी वृत्तसेवा

जत शहर : भरधाव दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात एका 23 वर्षीय परप्रांतीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवार, दि. 13 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास जत-येळदरी रस्त्यावर जत शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रसेन लोकसिंग तिलगाम (वय 23, सध्या रा. येळदरी, ता. जत; मूळ रा. कबर टोला, मध्य प्रदेश) हा दुचाकीवरून (क्र. एमएच 10 ईएम 7065) अक्षय रमेश मेरावी (वय 21) याला मागे बसवून जतहून येळदरीकडे जात होता. यावेळी त्याचा ताबा सुटल्याने दुचाकी घसरून दोघेही रस्त्यावर पडले.

या अपघातात चालक चंद्रसेन तिलगाम याचा गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला अक्षय मेरावी हा गंभीर जखमी झाला असून, स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच जत पोलिस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक गोडसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

याप्रकरणी जखमी अक्षय मेरावी याने दिलेल्या फिर्यादीवरून जत पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT