जत शहरात मुसळधार पाऊस 
सांगली

Jat Rain : जत शहरात मुसळधार पाऊस

रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

जत : जत शहरात सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत अक्षरशः झोडपून काढले. सुमारे दोन तास सलग पडलेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत असल्याने वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.

सायंकाळी शाळा आणि महाविद्यालये सुटण्याच्या वेळेतच पावसाने हजेरी लावल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे दुचाकीस्वारांना भिजतच मार्ग काढावा लागला. सखल भागांत पाणी साचल्यामुळे काही काळ वाहतूक मंदावली होती. दरम्यान, जत शहरासह तालुक्यातील वळसंग आणि कोळगिरी परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT