सांगली : मृणाल वष्ट
श्रावण महिना, रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुळाच्या दराने मुसंडी मारली न आहे. साखरेने पन्नाशी ओलांडली, तर गुळाने साठाच्या वर मजल मारली. गूळ दरात यंदा पाच वर्षांतील ही मोठी दरवाढ चे झाली. किलोमागे १० रुपयांची, तर क्विंटलमागे १,००० रुपये दरवाढ झाली.
गुळाची मागणी रथसप्तमीपर्यंत अधिक असते. विशेष म्हणजे सांगली पत बाजारपेठेत गुळाची उलाढाल बाराही ळ महिने चालते. ९० टक्के गूळ ात कर्नाटकातील रायबाग तालुक्यातून बार येतो. तेथून सध्या सांगली मार्केटमध्ये व रोज १०० टन गुळाची आवक होते.
एक, अर्धा आणि पाव किलोची ढेप, १० किलोच्या भेली आणि ३० ठी किलोचे रवे अशा स्वरूपात गूळ येतो. ग्राहक पाव किलो, अर्धा किलो, १ किलो गुळाच्या ढेपा अधिक मागवतात, अशी माहिती गूळ व्यापारी आदर्श हुक्केरी यांनी दिली. नागपंचमीला चिक्की गुळाची खरेदी अधिक होते. त्यामुळे चिक्कीसाठीच्या गुळाची मागणी दुपटीने वाढली. रक्षाबंधन आणि गणेशोत्सवात गुळाला अधिक पसंती दिली जाते. यंदा गूळ पावडरची मागणीही वाढली आहे.
यावेळी बाजारपेठेत रंग, रसायनविरहित शुध्द पिवळा गूळ आणि सेंद्रिय गूळ या दोघांचीच चलती आहे. केसरी रंग मिसळलेला, आरोग्यास अपायकारक असा गूळ बाजारात दिसत नाहीये. याचे श्रेय एफडीचे अधिकारी आयुक्त तुकाराम मुंढे यांना द्यावे लागेल.
कर्नाटकात पाऊस वाढल्यामुळे वाहतुकीस अडथळे येत आहेत आणि हवेतील आर्द्रतेमुळे गुळाच्या साठवणुकीतही अडचणी येतात. पाऊस सलग सुरू राहिला, तर गूळ निर्मिती आणि साठवणुकीवर परिणाम होतो. गूळ निर्मिती कमी झाली, तर आवक घटते आणि दरवाढ अटळ ठरते. यंदा गणपतीपर्यंत दरात आणखी ५ ते १० रुपयांची वाढ होण्याची शक्यता गूळ विक्रेते व्यक्त करत आहेत.
पाच-सहा वर्षांपासून शेतीत डाळिंब बागा आणि इतर फळांच्या लागवडीत गुळाचे पाणी वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी स्वतंत्र गूळ पावडर मिळते. गतवर्षी ती ३८ रुपये किलो-होती. ती यंदा ५५ ते ६० रुपये किलो आहे. फळांचा गोडवा वाढवण्यासाठी शेतकरी गुळाचे पाणी बागांना घालतात, असे गूळ व्यापाऱ्यांनी सांगितले. कोंबडी पशुखाद्यातही गुळाचा वापर केला जातो. जनावरांना गूळ पावडर पशुखाद्यातून घालतात. पोषक आहार म्हणून याकडे पाहिले जाते. त्यामुळेदेखील गुळाची मागणी वाढली आहे.
गुळातही साखरच
उसाच्या रसापासून गूळ तयार करत असताना साखरेचा वापर सध्या अधिक होतो. त्यामुळे साखरेचे दर वाढताच गुळाचेही दर वाढले. सणासुदीला गुळाचा वापर जास्त केला जातो. साहजिकच मागणी दुपटीने वाढते.
मुंबई, गुजरात, राजस्थानला पुरवठा
सांगली मार्केट यार्डात गुळाचे सौदे रोज होतात. त्यामुळे गुळाची आवक आणि जावक रोजच्या रोज मुबलक होते. परिणामी मोठी उलाढाल होते. रोज गुळाचे १० ते १२ ट्रक (१०० टन) सांगलीत येतात. सफेद गूळ गुजरातला पाठवला जातो. राजस्थानला सेंद्रिय रसायनविरहित गूळ पाठवला जातो. रक्षाबंधनासाठी या दोन राज्यांतून गुळाची मागणी सर्वाधिक असते. सांगलीतून हा गूळ पाठवला जातो.