ईश्वरपुरात आजपासून शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल 
सांगली

Sangli News : ईश्वरपुरात आजपासून शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल

खरेदी, खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाची मेजवानी

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : येथे आज, शुक्रवार दि. 13 मार्चपासून सुरू होणाऱ्या शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मंगळवारी मान्यवरांच्या हस्ते स्टॉल उभारणीचा प्रारंभ करण्यात आला. दै. पुढारी आणि प्रतिराज युवा शक्ती यांच्यावतीने या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.

17 मार्चपर्यंत चालणारा हा महोत्सव परिसरातील नागरिकांसाठी खरेदी, खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. येथील आमदार जयंत पाटील खुले नाट्यगृह येथे दरवर्षीप्रमाणे 13 ते 17 मार्चदरम्यान या फेस्टिव्हलचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महिला व बालकल्याण समिती, उरुण-ईश्वरपूर नगरपरिषद तसेच तनिष्का फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य हे या कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक आहेत. शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलमध्ये नेत्रदीपक रोषणाई व नावीन्यपूर्ण सजावट करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. त्यामुळे नागरिकांसाठी हा उत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, होम डेकोर, गारमेंट्स, फर्निचर, सौंदर्यप्रसाधने, किचन ट्रॉली, मसाले, लोणची, दागिने, बॅग्ज आणि प्लास्टिक वस्तूंची विस्तृत श्रेणी उपलब्ध असणार आहे.

चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र दालन उभारण्यात येणार असून ग्राहकांना वाहनांची माहिती, टेस्ट ड्राईव्हची संधी आणि स्पॉट बुकिंगवर विशेष सवलती मिळणार आहेत. याशिवाय विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही मोठ्या संख्येने असणार आहेत. या विविध कार्यक्रमांमुळे पाच दिवस चालणाऱ्या शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलला अधिकच रंगत येणार आहे. खरेदीसोबतच कुटुंबासमवेत आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी हा महोत्सव उत्तम संधी ठरणार आहे. खरेदीबरोबरच मनोरंजनाचे कार्यक्रम असल्याने कुटुंबासह, मित्रपरिवारासह या फेस्टिव्हलचा आनंद घेता येणार आहे. एकाच छताखाली नानाविध वस्तूंची खरेदी करण्यामुळे लोकांची मोठी सोय होणार आहे. या फेस्टिव्हलमधील स्टॉल्स आता मोजकेच शिल्लक राहिले असून नागरिकांनी या पाचदिवसीय महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मधू देसावळे (8308706122) यांच्याशी संपर्क साधावा.

पाच साड्यांसाठी दररोज लकी ड्रॉ

या पाच दिवसाच्या कार्यक्रमात ईश्वरपूर येथील पार्श्व सारीज्‌‍चे संचालक महेश ओसवाल यांच्याकडून कस्तुरी सभासद महिलांना दररोज पाच साड्यांचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. सभासद महिलांनी येताना त्यांचे नाव, मोबाईल नंबर व सभासद आईडी नंबरची चिठ्ठी ड्रॉच्या बॉक्समध्ये टाकणे बंधनकारक आहे. याची सोडत दररोज कार्यक्रमाच्या शेवटी होणार आहे.

कार्यक्रमांची रेलचेल...

फेस्टिव्हलदरम्यान दररोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. व्हॉईस ऑफ ईश्वरपूर प्रस्तुत नामदेव हांडे व मीरा शिंदे यांचा गाण्यांचा कार्यक्रम, नुपूर कथ्थक क्लासचा कथ्थक नृत्याविष्कार, ‌‘मिस अँड मिसेस कस्तुरी उरुण-ईश्वरपूर‌’ स्पर्धा, वेदिका वन ग्रॅम प्रस्तुत मॉडेल फॅशन शो, स्किल डान्स अँड फिटनेस स्टुडिओचा नृत्याचा कार्यक्रम, तसेच सेव्हन कलर म्युझिकल ग्रुपच्या मीनाज दिवाण व तन्वी सावंत यांच्या मराठी-हिंदी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT