ईश्वरपूर : पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ.स्मिता जाधव यांच्या प्रचारार्थ ईश्वरपूर येथील संस्थापक एकनाथराव जाधव यांच्या सद्गुरू आश्रमशाळेला भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
संस्थेचे सचिव रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमशाळेत शिक्षकांची बैठक घेण्यात आली. यावेळी ईश्वरपूर कार्यालयातील मधू देसावळे, अश्फाक आत्तार, सतीश कुंभार आणि सुनील माने यांनी डॉ. स्मिता जाधव यांच्या उमेदवारीची माहिती देत त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
सद्गुरू आश्रमशाळेतील सुमारे दीडशेहून अधिक शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी थेट संवाद साधण्यात आला. या संवादाला शिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने प्रचाराला सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.