चिरमुर्‍याच्या पोत्याआडून गुटखा वाहतूक 
सांगली

Satara News : चिरमुर्‍याच्या पोत्याआडून गुटखा वाहतूक

संशयित बुधगावमधील : सातारा एलसीबीकडून १८ लाखांचा गुटखा जप्‍त

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा शहरानजीक महामार्गावरील नागठाणे येथे ट्रक भरून सांगलीहून पुण्याकडे जाणार्‍या गुटखा असलेल्या ट्रकला स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण (एलसीबी) विभागाच्या पथकाने पकडले. चिरमुर्‍याच्या पोत्याआड गुटख्याची पोती लपवली होती. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. यामध्ये तब्बल १८ लाख रुपयांचा गुटखा जप्‍त केला आहे.

मच्छिंद्र आकाराम कांबळे (वय ५४, रा. बुधगाव, ता. मिरज, जि. सांगली) असे ताब्यात घेतलेल्‍या संशयिताचे नावे आहे. एक व्यक्ती ट्रक (एमएच १० झेड ४६९६) मधून महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री व वाहतुकीकरीता बंदी असलेला गुटखा, पानमसाला याची वाहतूक करत होते. त्‍यानुसार एलसीबीने नागठाणे येथे सापळा लावला. सांगलीकडून पुण्याकडे जाणारा ट्रक पोलिसांना दिसताच तो थांबवण्यात आला. पोलिसांनी ट्रकमध्ये पाहणी केली असता त्‍यामध्ये विमल पानमसाला व तंबाखू असा एकूण १७,६५,९४० रुपये किंमतीचा व ट्रक ७,५०००० असा एकूण २५,१५,९४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्‍त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT