मिरज : मिरजेत पत्रकार बैठकीत बोलताना आमदार इद्रिस नायकवडी.  
सांगली

Sangli News| झिरवळ यांच्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम

व्हिडीओ काढणाऱ्याची चौकशी व्हावी : आमदार इद्रिस नायकवडी यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मिरज : भोंदू बाबा अशोक खरात आणि मंत्री नरहरी झिरवळ आदी प्रकरणांमुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. झिरवळ यांच्या कथित व्हिडीओची चौकशी करून व्हिडीओ काढणाऱ्यास ताब्यात घ्यावे, अशी मागणी आमदार इद्रिस नायकवडी यांनी मिरजेत पत्रकार बैठकीत केली.

आमदार नायकवडी म्हणाले, मंत्री झिरवळ यांच्याविरोधात काही षड्‌‍यंत्र रचले आहे का, याची चौकशी होणे गरजेेचे आहे. मंत्री नीतेश राणे यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहेत. वाचाळवीर राणे यांना मंत्रिपदाचे भान नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका नायकवडी यांनी केली. अजितदादांच्या अपघात प्रकरणाची सीबीआय चौकशी झाल्यास सत्य समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, मिरज तालुक्यात सुमारे 130 कोटी रुपयांची विविध कामे करण्यात आली आहेत. मिरज शासकीय रुग्णालयात न्यूरो विभागासाठी 42 कोटी रुपये खर्चून ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक डिजिटल इन्स्ट्रक्शन अँजिओग्राफी मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. मिरज सिव्हिलमध्ये कॅथलॅब व कॅन्सर युनिट उभारणी सुरू असून, येथे सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका मुख्यालयाची नवीन इमारत, सांगली ते मिरज उड्डाणपूल तसेच मिरजेतील तंतुवाद्य क्लस्टरसाठी निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची संख्या जास्त असलेल्या सरकारी शाळांना खासगी शाळांप्रमाणे सुविधा मिळाव्यात यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT