Crime News Pudhari Photo
सांगली

Sangli Crime : पतीने काढला पत्नीचा कायमचा काटा

मलकापूरच्या डुबलनगर परिसरातील धक्कादायक घटना; संशयित पोलिस कोठडीत

पुढारी वृत्तसेवा

कराड : कौटुंबिक कारणांसह अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीवर चाकू हल्ला करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मलकापूर (ता. कराड) येथे घडली आहे. रोहिणी दत्तात्रय जांभळे (वय ३९) असे मृत पत्नीचे नाव आहे, तर दत्तात्रय नारायण जांभळे (४२) असे हल्लेखोर संशयित पतीचे नाव आहे.

डुबलनगर परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली असून संशयित पतीला पोलिसांनी गजाआड केले आहे. सोमवारी दुपारी त्याला न्यायालयाने त्यास ७ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या माहितीनुसार, मूळचे आणे येथील जांभळे दाम्पत्य काही वर्षांपासून डुबलनगर परिसरातील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये राहत होते. या दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणावरून सतत वाद होत होते आणि रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. या दरम्यान त्यांची दोन्ही मुले बाहेर खेळत होती. काही वेळाने मुलांना दत्तात्रय जांभळे घरातून घाईघाईत घरातून बाहेर येताना दिसलेे. त्यामुळे घाबरलेल्या मुलांनी घरात जाऊन पाहिले असता रोहिणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्याच अवस्थेत त्यांना सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

घाबरलेली मुले अन् तपास...

आम्ही खेळत असताना वडिलांना घाईघाईत घराबाहेर पडताना पाहिले आणि त्यावेळी त्यांच्या पायाला रक्त लागले होते, अशी माहिती मुलांनी नातेवाईकांसह पोलिसांना दिली आहे. कौटुंबिक कारणासह अनैतिक संबंधामुळे जांभळे दाम्पत्यामध्ये वारंवार खटके उडत होते, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर येत आहे. त्याची सत्यता पडताळली जात आहे. या घटनेचे निश्चित कारण सायंकाळपर्यत स्‍पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक दराडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT