विटा : पत्नीच्या मृत्यूचा शोक अनावर झाल्याने तिच्या रक्षाविसर्जनादिवशीच हृदयविकाराच्या धक्क्याने पतीचाही मृत्यू झाला. ही घटना खानापूर तालुक्यातील आळसंद येथे घडली. पती-पत्नीच्या आकस्मिक मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शनिवार, दि. 2 ऑगस्टरोजी आळसंद येथील सुनीता धनाजी जाधव (वय 37) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. हे दुःख सहन न झाल्याने त्यांचे पती धनाजी जाधव (वय 43) यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सुनीता यांचे रक्षाविसर्जन होते. मात्र रक्षाविसर्जनाच्या दिवशी सुनिता जाधव यांचे पती धनाजी जाधव यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, दोन मुले, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.