Hubballi Dadar Express
हुबळी-दादर एक्सप्रेसला किर्लोस्करवाडी स्थानकात थांबा  File Photo
सांगली

हुबळी-दादर एक्सप्रेसला किर्लोस्करवाडी स्थानकात थांबा

sonali Jadhav

मिरज : हुबळी-दादर-हुबळी एक्सप्रेसला किर्लोस्करवाडी स्थानकात थांबा देण्याची गेल्या अनेक वर्षापासून प्रवाशांची मागणी होती. या मागणीला आता यश आले असून 7 जुलै पासून या एक्सप्रेसला प्रायोगिक तत्त्वावर किर्लोस्करवाडी स्थानकात थांबा देण्यात आला आहे. Hubballi Dadar Express

मिरज-पुणे रेल्वे मार्गावर धावणारे अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या किर्लोस्करवाडी स्थानकात थांबत नाहीत. लांब पल्ल्यांच्या गाड्यांना किर्लोस्करवाडी स्थानकात थांबा दिल्यास पलूस आणि कडेगाव तालुक्यातील प्रवाशांची सोय होणार आहे. त्यामुळे या स्थानकात l गाड्यांना थांबा देण्याची प्रवाशांची मागणी होती.

लांबल्यांच्या गाड्यांना किर्लोस्कोवाडी स्थानकात थांबा देण्याची मागणी मिरज रेल्वे कृती समितीचे मकरंद देशपांडे, सुकुमार पाटील, सुभाष मिश्रा, ओंकार शिखरे, ज्ञानेश्वर पोतदार, नितीन आवटी आणि राजेश कुकरेजा यांनी रेल्वे कडे केली होती. त्यांच्या मागणीला अखेर यश आले असून हुबळी- दादर -हुबळी एक्सप्रेसला प्रायोगिक तत्त्वावर किर्लोस्करवाडी स्थानकात थांबा देण्यात आला आहे.

दादर- हुबळी एक्सप्रेस किर्लोस्करवाडी स्थानकात दररोज थांबणार असल्याने याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही रेल्वे कडून करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT