सांगली : हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबणार आहे. किर्लोस्करवाडीतून कराड - सातारा - पुणे जाण्यासाठी आठवड्यातून सहा दिवस वंदे भारत गाडी उपलब्ध होणार आहे. किर्लोस्करवाडीतून हुबळी - धारवाड - बेळगाव - घटप्रभा आठवड्यातून तीन दिवस वंदे भारत गाडीने जाता येईल. खासदार विशाल पाटील यांनी संसदेत केलेले प्रयत्न व जिल्हा नागरिक जागृती मंचने दि. 5 जुलै रोजी केलेले आंदोलन याला यश आले आहे, अशी माहिती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिली.
साखळकर म्हणाले, रेल्वेचे अधिकृत नोटिफिकेशन आले आहे. येत्या काही दिवसात हुबळी-पुणे वंदे भारत गाडी किर्लोस्करवाडी येथे थांबू लागेल. आता किर्लोस्करवाडी स्टेशनवर चार वंदे भारत गाड्या थांबणार आहेत. या वंदे भारत गाडीमुळे तासगाव, पलूस, कडेगाव वाळवा, खानापूर, आटपाडी तालुक्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. त्यांना वेगवान वंदे भारत गाडीने पुणे, बेळगाव, हुबळी, धारवाड, सांगली, मिरज, कोल्हापूर, कराड, सातारा, घटप्रभा (गोकाक धबधबा) इत्यादी ठिकाणी जाता येणार आहे.
प्रवाशांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जास्तीत जास्त तिकिटे काढून किर्लोस्करवाडी स्टेशनवरून वंदे भारत गाडीतून प्रवास करावा. जेणेकरून किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनचे उत्पन्न वाढेल व इतर अनेक रेल्वे गाड्यांसाठी किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबा मिळवता येईल, असे साखळकर यांनी सांगितले.
सांगली रेल्वे स्टेशनवर कोचिंग टर्मिनल, रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सुविधा, प्रवाशांसाठी सुसज्ज रिटायरिंग रूम, क्लॉक रूम व एक्स्प्रेस गाड्यांमधून सांगली रेल्वे स्टेशनवरून पार्सल पाठवण्याची सुविधा सुरू करण्यासाठी नागरिक जागृती मंचचे जनआंदोलन सुरूच राहणार आहे, असे साखळकर यांनी सांगितले.
बुधवार, शुक्रवार, रविवार
हुबळी पहाटे 5 वाजता सुटेल
धारवाड पहाटे 5:17 वा.
किर्लोस्करवाडी सकाळी 9:45
पुणे दुपारी 1:30 वाजता पोहोचेल
सोमवार, गुरुवार, शनिवार
पुणे दुपारी 2:15 वाजता सुटेल
किर्लोस्करवाडी संध्याकाळी 5:40
बेळगाव रात्री 8:15
धारवाड रात्री 10:13
हुबळी रात्री 10:45 वाजता पोहोचेल.
सोमवार, गुरुवार, शनिवार
कोल्हापूर सकाळी 8:15 वाजता सुटते
किर्लोस्करवाडी सकाळी 9:45
पुणे दुपारी 1:30 ला पोहोचेल
बुधवार, शुक्रवार, रविवार
पुणे दुपारी 2:15 वाजता सुटेल
किर्लोस्करवाडी संध्याकाळी 5:40
किर्लोस्करवाडी ते पुणे - फक्त 3 तास 40 मिनिटे
किर्लोस्करवाडी ते बेळगाव - फक्त 2 तास 35 मिनिटे
किर्लोस्करवाडी ते धारवाड- फक्त 4 तास 33 मिनिटे
किर्लोस्करवाडी ते हुबळी - फक्त 5 तास