बारावीचा पेपर अवघड गेल्याच्या नैराश्येतून विद्यार्थ्याने संपविले जीवन  
सांगली

Sangli Crime : बारावीचा पेपर अवघड गेल्याच्या नैराश्येतून विद्यार्थ्याने संपविले जीवन

संजयनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद

पुढारी वृत्तसेवा

सांगली : ऑक्टोबर महिन्यात सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने आलेल्या नैराश्येतून तरुणाने राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन जीवन संपविले. दत्तात्रय विठ्ठल नरळे (वय १८, रा. भगत प्लॉट, लक्ष्मीनगर, वसंतदादा साखर कारखान्यासमोर, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दत्तात्रय हा रात्रशाळेत बारावीचे शिक्षण घेत होता आणि दिवसा काम करत होता. ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या परीक्षेतील पेपर अवघड गेल्याने तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. शुक्रवारी सायंकाळी घरात कोणी नसताना त्याने नैराश्येतून गळफास घेतला. त्याची आई कामावरून घरी परतल्यानंतर खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, दत्तात्रय गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

त्याला तातडीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दत्तात्रय हा नरळे कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. पोलिसांनी पालकांचा जबाब नोंदवला असून, प्राथमिक तपासात पेपर अवघड गेल्याच्या नैराश्येतूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT