कोल्हापूर आणि उदगावमध्ये कोट्यवधींच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या. पण बनावट नोटांबाबतची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेकदा अशा खोट्या नोटा चलनात आणण्याचे प्रकार घडले आहेत. प्रश्न असा आहे की, सामान्य माणसाला खरी नोट आणि बनावट नोट यातला फरकच समजत नाही आणि मग बनावट नोटांचा बाजार चालतो. गृह मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेने काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही नकली नोट लगेच ओळखू शकता.
सावधानतेची गरज...
1. खर्या नोटेवर महात्मा गांधीजींचा फोटो स्पष्ट, मध्यभागी असतो. बनावट नोटेमध्ये फोटो धूसर किंवा थोडासा वेगळ्या कोनात दिसतो.
2. स्पेलिंग- खरी नोट असेल तर त्यावर इंग्रजीत ङ्गठएडएठतए इअछघ जऋ खछऊखअङ्घ असं स्पष्ट लिहिलेलं असतं. पण बनावट नोटांमध्ये “ठएडएठतए” या शब्दात ‘ए’ ऐवजी ‘अ’ छापलेलं आहे. म्हणजे “ठएडअठतए” असं चुकीचं लिहिलेलं असतं.
3. रंग : 500 रुपयांच्या नोटेवर समोरच्या बाजूला हिरव्या रंगात ‘500’ असा आकडा असतो. खरी नोट तुम्ही थोडीशी तिरकी केलीत, तर हा आकडा निळ्या रंगात बदलतो. पण जर रंगात कोणताही बदल झाला नाही, तर ती नोट बनावट असण्याची शक्यता आहे.
4. खर्या नोटेमध्ये सिक्युरिटी थ्रेड आणि नंबर्स प्रकाशात चमकतात. बनावट नोटेमध्ये तसं होत नाही.
बनावट नोट मिळाल्यास काय करावे?
1. ती वापरण्याचा प्रयत्न करू नका - भारतीय दंड संहितेच्या कलम 489 अंतर्गत जाणूनबुजून बनावट चलन वापरणे हा दंडनीय गुन्हा आहे.
2. जवळच्या बँक किंवा पोलिस ठाण्यात कळवा - बँकांना बनावट नोटा जप्त करून त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कळवाव्या लागतात.
3. एटीएममधून पैसे मिळाल्यास, बँकेला ताबडतोब कळवा - एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेर्याला नोट दाखवा आणि तुमची पैसे काढण्याची पावती संदर्भासाठी ठेवा.
काय काळजी घ्याल?
कोणतीही 500 रुपयांची नोट घेताना, ती तपासून घ्या.
जर तुम्हाला नोटेबद्दल शंका आली, तर ती घेऊ
नका किंवा बँकेत जाऊन तपासून घ्या.