मिरज : जानराववाडी (ता. मिरज) येथे घरात घुसून महिलेचे 25 हजार रुपये किमतीचे दागिने चौघांनी चाकूच्या धाकाने लुटले. याप्रकरणी बाळासाहेब बाबू कवठेकर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. रविवार, दि. 28 रोजी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
बाळासाहेब कवठेकर हे कुटुंबासमवेत जानराववाडी येथे राहतात. रविवारी रात्री चौघे चारेटे त्यांच्या घरात घुसले. त्यांना चाकूचा धाक दाखविला व सजाक्का बाळासाहेब कवठेकर यांच्या गळ्यातील 25 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र त्यांनी जबरदस्तीने काढून घेतले आणि पलायन केले. याबाबत बाळासाहेब कवठेकर यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.