RTO Pudhari
सांगली

Sangli RTO News: भरमसाट कराने वाहनांचे नूतनीकरण परवडेना!

जिल्ह्यातील 54 टक्के वाहनांनाच एचएसआरपी; मुदत संपून दीड महिना लोटला

पुढारी वृत्तसेवा

सांगली : वाहनांना एचएसआरपी (उच्च सुरक्षा नोदणी प्लेट) बसवण्याची मुदत संपून दीड महिना लोटला असलातरी जिल्ह्यातील 5 लाख 59 हजार 297 वाहनापैकी 3 लाख 4 हजार 687 वाहन धारकानीच एचएसआरपी बसवल्या आहेत. याची टक्केवारी केवळ 54.47 टक्केच आहे. जुन्या वाहनांना रिपासिंग शुल्कासह भरमसाठ दंड आकारणीमुळे एचएसआरपी बसविण्याकडे वाहनधारकांचे दुर्लक्ष होत आहे. आता मुदत संपून गेली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईचा बडगा मात्र अद्याप उगारलेला नाही.

जिल्ह्यामध्ये वाहनांची संख्या 14 लाख 50 हजाराच्या घरात आहे. 1 एप्रिल 2019 नंतरच्या वाहनांना एचएसआरपी बसवण्यात आली आहे. त्यापूर्वीची सांगली जिल्ह्यातील वाहनांची संख्या 5 लाख 59 हजार 297 अशी आहे. 10 फेब्रुवारीअखेर यातील 3 लाख 4 हजार 687 वाहनांना एचएसआरपी (उच्च सुरक्षा नोदणी प्लेट) बसवण्यात आली आहे. अद्याप 2 लाख 54 हजार 610 वाहनांना एचएसआरपी बसवण्यात आलेल्या नाहीत. अद्याप सुमारे 46 टक्के वाहनांना एचएसआरपी बसवण्यात आलेल्या नाहीत. याची मुदत संपून दीड महिना लोटला आहे. मात्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने अद्याप कारवाई सुरु केलेली नाही.

प्रशासनाकडून एचएसआरपी बसवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जुन्या वाहनांना पासिंग करण्यासाठी विविध कर आणि दंड आकारणी केली जाते. यामुळे वाहनधारकांचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे जुनी वाहने एचएसआरपी न बसतातच फिरत आहेत. बहुतांशी वाहनधारक वाहन भंगार (स्क्रॅप) करण्यास तयार आहेत. मात्र यासाठीही पूर्वीचे सर्व कर भरावे लागतात. यामुळे करमाफीसह भंगार करण्यासाठी शासनमान्य केंद्र उभारण्याची मागणी होत आहे.

1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना एचएमआरपी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील 43 ठिकाणी यासाठी स्वतंत्र केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. याची मुदत 31 डिसेंबर 2025 ला संपली आहे. यापुढेही वाहनधारकांनी एचएमआरपी नंबरप्लेट बसवावी, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे.
- प्रसाद गाजरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT