हरिपूर (ता. मिरज) येथे महाशिवरात्रीनिमित्त संगमेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  
सांगली

Miraj News : ‘हर हर महादेवऽऽ‌’च्या जयघोषाने हरिपूर दुमदुमले

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी; विविध धार्मिक कार्यक्रम

पुढारी वृत्तसेवा

हरिपूर : हरिपूर (ता. मिरज) येथे महाशिवरात्रीनिमित्त संगमेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हरिपूर हे ठिकाण कृष्णा आणि वारणा नद्यांच्या संगमावर वसलेले असल्याने या यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. पहाटेपासूनच मंदिर परिसरात ‌‘हर हर महादेवऽऽ‌’च्या जयघोषाने वातावरण शिवमय झाले होते. सकाळी काकड आरती, रुद्राभिषेक, महाआरती, प्रसादाचे वाटप, 3 वाजता महापूजा, सायंकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

ओंकार पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूजा बांधली होती. यावेळी हरिपूरच्या सरपंच राजश्री तांबवेकर, उपसरपंच गणपती साळुंखे, तसेच नूतन जिल्हा परिषद सदस्य अरविंद तांबवेकर, नूतन पंचायत समिती सदस्या शोभा मोहिते, पोलिस पाटील उमाकांत बोंद्रे यांच्यासह देवस्थान कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. दिवसभर आरती, भजन असे धार्मिक कार्यक्रम सुरू होते. पोलिस आणि मंदिर प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आमदार सुधीर गाडगीळ यांनी संगमेश्वर मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले. देवस्थान समितीतर्फे पिण्याचे पाणी, पार्किंग आणि सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. यात्रेत खेळणी, मिठाई, इतर घरगुती वस्तूंची दुकाने थाटली होती. सांगलीतून बस सेवा बंद असल्याने रिक्षांच्या फेऱ्या सुरू होत्या. मंदिर परिसरात अनेक भाविकांनी प्रसादाचे वाटप केले. महाशिवरात्र आणि रविवारनिमित्त शाळा, सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुटी असल्याने दुपारनंतर भाविकांच्या संख्येत वाढ झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT