Tobacco Ban File Photo
सांगली

Tobacco Ban | जत तालुक्यात गुटखा, मावा विक्री जोमात

सीमाभाग परिसरात शासन आदेशाची ‘ऐसी की तैसी’: प्रशासनाचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

जत शहर : विश्वनाथ तळसंगी

राज्य शासनाने गुटखा व मावा बंदीचा आदेश दिला आहे; मात्र बंदीची अंमलबजावणी जत शहरात व तालुक्यात केली जात नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. शहर व ग्रामीण भागामध्ये गुटखा व माव्याची खुलेआम विक्री सुरूच आहे.

अन्न-औषध प्रशासन विभागाने जत तालुक्यात लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. राज्य शासनाने गुटखाबंदी जाहीर केली. गुटखाबंदी ही महाराष्ट्रात घालण्यात आली; मात्र कर्नाटक राज्यात गुटखाबंदी नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रातील गुटखा तयार करणार्‍या कंपन्या कर्नाटकात विक्री करू लागल्या.

जत तालुका हा कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेला तालुका आहे. विजापूर व अथणी कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या जत तालुक्याच्या सीमेवर असलेले तालुके आहेत. जत शहरातील व ग्रामीण भागातील गावातील व्यापार्‍यांचा संपर्क येतो.

कर्नाटक सरकारने गुटखाबंदी घालण्यात आली असली तरी कर्नाटकातून गुटख्याची आवक थांबायला हवी; परंतु कर्नाटकातून गुटखा तालुक्यात मोठ्या प्रमाणात येतच आहे. गुटखाबंदीनंतर राज्य शासनाकडून व्यसनाला तरुण पिढी बळी पडू नये म्हणून मावा विक्रीला बंदी घालण्यात आली.

राज्य शासनाच्या या आदेशाची अंमलबाजवणी केवळ कागदावरच राहिली आहे. मावा विक्री बंद झालेल्या आदेशापासून तालुक्यात अशी कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. माव्याची विक्री कोठेही होऊ नये, याची संपूर्ण जबाबदारी शासनाच्या अन्न- औषध प्रशासन विभागाची आहे; पण या विभागाने बंदी आदेशाची ‘ऐसी की तैसी’ केली आहे. जत शहराबरोबर तालुक्यातील डफळापूर, बिळूर, शेगाव, माडग्याळ, संख, उमदी यासह विविध मोठ्या गावांसह इतर गावांतसुद्धा मावा विक्री सुरू आहे.

माव्याची विक्री इथे सुरू

शहरातील बसस्थानक, निगडी कॉर्नर, सोलनकर चौक, गांधी चौक परिसर, शिवाजी पेठ रस्ता, मार्केट यार्डच्या समोर वसलेल्या कपाटात, लोखंडी पूल, मंगळवार पेठ, महाराणा प्रताप चौक, संभाजी चौक, अथणी रोड तसेच तालुक्यातील प्रत्येक गावातील मुख्य चौकात, बसस्थानक या ठिकाणी माव्याची उघडपणे विक्री करणारे दुकाने, कपाटे आहेत. अगदी रस्त्यावर मावा तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीत मटेरियल टाकून लोक ती हातावर घासत उभे दिसतात.

Here are the meta keywords in English for the provided Marathi headline:

- and ban order

- Enforcement of

- sale in Jat

- in rural areas

- Government ban on tobacco products

- Gutkha ban violation

- Open sale of banned substances

-

- enforcement issues

-and gutkha ban

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT