Job Fraud Pudhari
सांगली

Sangli job fraud: सरकारी नोकरीच्या आमिषाने साडेअकरा लाखांचा गंडा

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे कार्यालयात कनिष्ठ लिपिकाची नोकरी लावण्याच्या आमिषाने सांगलीतील तरुणाला तब्बल 11 लाख 59 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे कार्यालयात कनिष्ठ लिपिकाची नोकरी लावण्याच्या आमिषाने सांगलीतील तरुणाला तब्बल 11 लाख 59 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी स्वप्निल उद्धव कांबळे यांनी चंद्रकांत यादव (रा. कोडोली, जि. कोल्हापूर), राजाराम दत्तात्रय होळंबे (रा. कोल्हापूर) आणि ज्ञानेश्वर चौधरी (रा. पुणे) या तिघांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

स्वप्निल कांबळे हे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होते. चंद्रकांत महापुरेसह तिघांनी स्वप्निल यांना सार्वजनिक बांधकाम विभागातील पुण्यातील कार्यालयात कनिष्ठ लिपिक पदाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार स्वप्निल यांना 11 लाख 59 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. स्वप्निल यांनी ती रक्कम दिलीही. त्यानंतर तिघा संशयितांनी स्वप्निल यांना सार्वजनिक बांधकाम विभागात सांगलीतील कार्यालयात नियुक्तीपत्र दिले. परंतु त्याची चौकशी केली असता संबंधित नियुक्तीपत्र हे बनावट असल्याचे स्वप्निल यांच्या निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी तिघांकडे दिलेली रक्कम परत देण्याची मागणी केली. परंतु तिघांनी रक्कम परत न दिल्याने तिघांविरुद्ध स्वप्निल यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT