Gopichand Padalkar  (Pudhari Photo)
सांगली

Gopichand Padalkar | डफळे कारखाना पुन्हा सभासदांच्या मालकीचा करा : गोपीचंद पडळकर

विधानसभेत मागणी

पुढारी वृत्तसेवा

जत : जत शहरालगत २५० एकरांवर उभारलेला डफळे सहकारी साखर कारखाना पुन्हा २२ हजार सभासदांच्या मालकीचा करावा आणि त्याच्या लिलाव प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करून सर्व कागदपत्रे सभागृहासमोर ठेवावीत, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत केली.

अधिवेशनात आठवडा स्थगन प्रस्तावावरील चर्चेत त्यांनी डफळे कारखान्याच्या विक्री प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला. दुष्काळग्रस्त जत, कवठेमहांकाळ, सांगोला आणि मंगळवेढा परिसरातील २२ हजार सभासदांनी दागिने गहाण ठेवून, जनावरे विकून आणि शेअर्स भरून हा कारखाना उभारला. मात्र शहरालगतचा हा कारखाना कवडीमोल दरात विकला गेल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्य सहकारी बँक, सहकार आयुक्त कार्यालय आणि संबंधित यंत्रणांकडे कागदपत्रे मागूनही ती उपलब्ध होत नसल्याचा दावा करत लिलाव प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. सहकारी साखर कारखान्यांच्या विक्री प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन करून शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने पुन्हा शेतकऱ्यांकडे द्यावेत, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेसाठी मंजूर निधीबद्दल सरकारचे आभार मानले. तसेच जत-उमदी रस्ता, नगरपालिकेची प्रशासकीय इमारत, प्राणीसंग्रहालय, महाज्योती व वनार्टी योजना, संत बसवेश्वर स्मारक आणि पुणे–मुंबई कनेक्टिंग लिंकला 'वीर शिंग्रोबा' यांचे नाव देण्याची मागणीही सभागृहात केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT