पॉलिशच्या बहाण्याने चार लाखांचे सोने घेऊन कामगार पसार File Photo
सांगली

पॉलिशच्या बहाण्याने चार लाखांचे सोने घेऊन कामगार पसार

सांगलीतील सराफ कट्ट्यात घटना : बंगाली कामगारावर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

सांगली ः शहरातील सराफ कट्टा परिसरातील महिलेला सोने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 3 लाख 91 हजार 782 रुपयांचे सोने घेऊन बंगाली कामगार पसार झाल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार सोमवार दि. 14 एप्रिलरोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी जस्मिन अब्दुलरशीद मंडल (वय 38, रा. गवळी गल्ली, सांगली) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित कार्तिक चारीदार (मूळ रा. बक्षा होगली, पश्चिम बंगाल, सध्या गवळी गल्ली, सांगली) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जस्मिन मंडल या कुटुंबीयांसह गवळी गल्ली परिसरात राहतात. त्यांच्याच बिल्डिंगमध्ये संशयित चारीदार याचा सोने-चांदी दागिन्यांचा व्यवसाय आहे. चारीदार याच्याशी जस्मिन यांची ओळख होती. सोमवार दि. 14 एप्रिलरोजी त्याने जस्मिन यांचा विश्वास संपादन करून, तुमच्याकडील सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, असे सांगितले. त्यांच्याकडून 57.94 ग्रॅम वजनाचे 3 लाख 91 हजार 782 रुपयांचे दागिने घेतले. दागिने घेऊन अनेक दिवस उलटले तरी तो ते परत देत नव्हता. त्याला विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. अखेर फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच मंडल यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार्तिक चारीदार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT