सांगली ः शहरातील एका मंगल कार्यालयात वर्हाडी मंडळींकडील एकाच्या बॅगमधून चोरट्याने 2 लाख 21 हजारचे दागिने लंपास केले. याबाबत अंजली ज्ञानेश्वर कोल्ले (रा. भोरे वस्ती, भोसरे, ता. माढा. जि. सोलापूर) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना रविवार दि. 4 रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास घडली.
शहरातील सुशांत गार्डन मंगल कार्यालयात समारंभासाठी फिर्यादी कोल्ले आल्या होत्या. त्यांनी बॅग कार्यालयातील खोलीत ठेवली होती. चोरट्याने बॅगेत ठेवलेले सोने -चांदीचे दागिने लंपास केले. यामध्ये 60 हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची अंगठी (किंमत 60 हजार), 25 हजाराची अर्धा तोळ्याची अंगठी, 27 हजाराचे सात ग्रॅम वजनाचे लॉकेट, 30 हजारांचा सोन्याचा गोफ, 45 हजाराचे दीड तोळ्याचे गंठण, 30 हजाराच्या एक तोळ्याच्या बिंदल्या, चांदीचे पैजण, जोडवी, बिंदल्या या दागिन्यांचा समावेश आहे. काही वेळानंतर चोरीची घटना निदर्शनास आली.