Gold Silver Price Today file photo
सांगली

Gold and silver price: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

सोने ४,७९१ तर चांदी १६,४८० रुपयांनी स्वस्त

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सोन्या-चांदीच्या दरात शुक्रवारी मोठी घसरण झाली. सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमला ४ हजार ७९१ रुपयांनी, तर चांदीचा दर प्रति किलोला तब्बल १६ हजार ४८० रुपयांनी उतरला आहे. या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सराफ बाजारात गुरुवारी सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम १ लाख ५५ हजार ६३६ रुपये, तर चांदीचा दर प्रति किलो २ लाख ५४ हजार ९२५ रुपये होता. मात्र, शुक्रवारी बाजारात मोठी पडझड होऊन सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम १ लाख ५० हजार ८९५ रुपयांवर आला. तसेच चांदीचा दरही प्रति किलो २ लाख ३८ हजार ४४५ रुपयांपर्यंत खाली आला. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि बाजारपेठेतील बदलांमुळे ही मोठी घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT