सांगली : संशयितावर कारवाईसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. Pudhari Photo
सांगली

सांगलीत बालिकेवर स्वच्छतागृहात अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

शहरातील उपनगरात राहणार्‍या नऊ वर्षांच्या बालिकेला मोबाईल दाखवण्याचे आमिष दाखवून बंद असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहात लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. ही घटना मंगळवारी (दि. 8) दुपारी घडली. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार र्ईश्वर महादेव कांबळे (वय 26, रा. संजयनगर) याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी संशयिताला पकडून बेदम चोप दिला. या घटनेचे बुधवारी उपनगरात पडसाद उमटले. संतप्त जमावाने घटनास्थळाची तोडतोड केली. नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या मारत संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केल्याने काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

संशयित कांबळे याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, दोन दिवस पोलिस कोठडी दिली. संशयित कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पीडित नऊ वर्षांची मुलगी मंंगळवारी दुपारी घराबाहेर खेळत होती. यावेळी संशयित कांबळेने तिला मोबाईल दाखविण्याचे आमिष दाखवून बंद असलेल्या स्वच्छतागृहात नेले. तिथे तिच्याशी अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. परिसरातील एका व्यक्तीने हा प्रकार पाहिला. कांबळे हा तेथून पळून गेला.

संबंधिताने घडलेला प्रकारपीडितेच्या आई आणि वडिलांना सांगितला. तिच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर लैंगिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याची माहिती मिळताच नागरिकांनी संशयिताला शोधून त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी संशयित कांबळे विरोधात पोक्सोतर्गंत लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT