मिरज : निलजी (ता. मिरज) येथे शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून सुमारे 70 हजाराचा ऐवज लुटल्याप्रकरणी ग्रामिण पोलिसांनी चार संशयिताना ताब्यात घेतले. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सर्वांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
निलजी येथे शुक्रवारी मध्यरात्री चार चोरट्यांनी कर्नाटकातील मजूर कुटुंबाच्या घरात शिरून शेतमजूर दाम्पत्यास कोयत्याचा धाक दाखवत महिलेस मारहाण केली. मंगळसूत्र, पैंजण, मोबाईल व चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 70 हजाराचा ऐवज लुटला. त्यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर चारही चोरटे अंधारात पसार झाले. रविवारी पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पथके स्थापन केली आहेत.
सुमारे 70 पोलिसांच्या पथकाने संशयावरुन तालुक्यातील सोनी,वड्डी, लिंगनूर, दंडोबा परिसरातील अनेक वस्त्यांवर छापे मारले. चोरट्यांनी घटनास्थळी सोडलेली एक दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संशयित्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.