theft case Pudhari
सांगली

Sangli Factory theft case: कारखान्यातील 7 लाखांची चोरी करणाऱ्या टोळीला अटक

कुपवाड एमआयडीसीतील माईड प्लो या कारखान्यातील 7 लाख रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीला कुपवाड पोलिसांनी जेरबंद केले

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील माईड प्लो या कारखान्यातील 7 लाख रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीला कुपवाड पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केला.

गंगा गणेश गोसावी (वय 46, रा. प्रकाशनगर, कुपवाड), आकाश ज्ञानू गोसावी (वय 33), विकास ज्ञानू गोसावी (वय 36, दोघेही रा. रविवार पेठ, गोसावी गल्ली, माधवनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. निवास सुंदर घाडगे (वय 33, रा. प्रकाशनगर, कुपवाड), भरत ऊर्फ बंटी नामदेव जाधव (रा. माधवनगर), बंटी (पूर्ण नाव व पत्ता नाही. रा. वाल्मिकीनगर, सांगली) या तीन फरारी संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.

फिर्यादी राकेश परशुराम महाजन (रा. दत्तनगर, बामणोली, ता. मिरज) यांची कुपवाड एमआयडीसीत ‌‘माईड प्लो‌’ कंपनी आहे. कंपनीतील मोकळ्या जागेत ॲल्युमिनियम साहित्य ठेवले होते. चोरट्यांनी दि. 25 मे 2025 ते दि. 22 नोव्हेंबर 2025 या कालावधीत कंपनीच्या भिंतीच्या कंपाउंडवरून उड्या मारून आवारातील 7 लाख रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम साहित्याची चोरी केली. पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला असता गोपनीय माहिती मिळाली की, संशयित गंगा गोसावीच्या टोळीने ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी चोरीतील मुद्देमाल जप्त केला. चोरी करण्यासाठी गुन्ह्यात वापरलेला टेम्पो (एमएच 09, बीसी 1258) जप्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT