pudhari photo
सांगली

सांगली : खाडे म्हणतात, माझ्या माघारी तोडा झाडे

Bribe case : वनअधिकारी पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी: आटपाडी वनपरिक्षेत्र कार्यालयातील वन परिक्षेत्राधिकारी अशोक खाडे हे झाडे तोडण्यासाठी सहकार्य करण्याच्या मोबदल्यात लाच घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. अशोक खाडे यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ब्रह्मानंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

खाडे यांनी सहकार्य करावे म्हणून एक व्यक्ती वृक्ष तोडीबाबत वनपरिक्षेत्र कार्यालयात मोठया अपेक्षेने गेला होता.यावेळी अधिकारी खाडे यांच्याशी झालेला संपूर्ण संवाद हा चित्रित करण्यात आला.व्हिडिओत वनअधिकारी खाडे म्हणतात की , माझ्या माघारी तुम्ही कितीही झाडे तोडा, मी काही म्हणणार नाही. पण मी असल्यावर झाडे तोडू नका.

व्हिडिओत बेकायदेशीर वृक्ष तोडीस सहकार्य करण्यासाठी काही रक्कम दिली असल्याचे हे चित्रीकरण आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.आटपाडी शहरापासून वनपरिक्षेत्र कार्यालय हे दूर आहे.कार्यालय लांब असल्याने अधिकारी बिनधास्तपणे मनमानी कारभार करतात. त्यामुळे हे कार्यालय प्रशासकीय कार्यालयात यावे अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT