संभाव्य पूरस्थितीसाठी 120 गावांत उपाययोजना 
सांगली

Sangli : संभाव्य पूरस्थितीसाठी 120 गावांत उपाययोजना

50 लाख मंजूर; निवारा, चारा छावणीचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यात संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने 120 गावांत उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी प्राथमिक स्वरूपात शासनाकडून 50 लाखाचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी सन 2019 व 2021 मध्ये पूरस्थितीला तोंड दिलेल्या 120 गावांमध्ये उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये चारा छावणी, पूरग्रस्तांसाठी निवारा, प्रत्येक गावातील पोहणार्‍या व्यक्तींची नावे, बोटी, औषधे आदींची तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर जनावरांना चारा, औषध, खाद्य पुरवण्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात पूर आल्यास याचा तत्काळ पुरवठा करण्याच्यादृष्टीने नियोेजन करण्यात आले आहे. तालुकानिहाय निवारा, चारा छावणी आणि इतर कामासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिराळा तालुका ः संभाव्य 21 गावे : मोहरे, काळुंद्रे, चरण, सोनवडे, सागाव, ढोलेवाडी, आरळा, पुनवत, मांगले, देववाडी, खुजगाव, कोकरूड, चिंचोली, कांदे, चिखली, बिळाशी, पणुंब्रे तर्फ वारूण, मराठवाडी, मणदूर, अस्वलेवाडी, शिराळा खुर्द.

पलूस तालुका ः संभाव्य 25 गावे : भिलवडी, तावदरवाडी, माळवाडी, सुखवाडी, चोपडेवाडी, खंडोबाची वाडी, अंकलखोप, नागठाणे, सूर्यगाव, राडेवाडी, ब्रह्मनाळ, खटाव, वसगडे, तुपारी, दह्यारी, घोगाव, दुधोंडी, पुणदी, वाळवा, नागराळे, बुर्ली, आमणापूर, पुणदीवाडी, विठ्ठलवाडी, अनुगडेवाडी, पलूस.

मिरज तालुका व सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका ः संभाव्य 21 गावे : निलजी, बामणी, इनाम धामणी, जुनी धामणी, अंकली, दुधगाव, सावळवाडी, समडोळी, कसबे डिग्रज, तुंग, पद्माळे, कर्नाळ, मौजे डिग्रज, हरिपूर, माळवाडी, ढवळी, वड्डी, कवठेपिरान, म्हैसाळ, नांद्रे, सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्र.

संभाव्य पूरग्रस्त गावे...

वाळवा तालुका ः संभाव्य 38 गावे : ऐतवडे खुर्द, कुंडलवाडी, जुनेखेड, वाळवा, शिरगाव, नवेखेड, ताकारी, गौंडवाडी, साटपेवाडी, दुधारी, चिकुर्डे, करंजवडे, ठाणापुडे, देवर्डे, कणेगाव, भरतवाडी, तांदुळवाडी, हुबालवाडी, बहे, खरातवाडी, बोरगाव, फार्णेवाडी, बनेवाडी, मसुचीवाडी, कोळे, शिरटे, नरसिंहपूर, मर्दवाडी, कृष्णानगर, मिरजवाडी, कारंदवाडी, कासेगाव, धोत्रेवाडी, तांबवे, शिगाव, रेठरे हरणाक्ष, नेर्ले, बिचूद.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT