Ambulance Pudhari
सांगली

Ambulance Obstruction: रुग्णवाहिकेचा रस्ता अडवल्याने 10 हजार दंड

पहिलीच कारवाई; आपत्कालीन वाहनांना मार्ग देण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

सांगली : वाहनांच्या कागदपत्रांच्या तपासणीसाठी वाहन कडेला न घेता रुग्णवाहिकेला जाण्यास अडथळा निर्माण केल्याबद्दल वाहनधारकाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. अशाप्रकारे कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन आदी आपत्कालीन वाहन रस्त्यावर प्रवास करत असताना इतर वाहनांमार्फत अडथळा निर्माण होत असल्यास अशा वाहनमालकाविरुध्द 10 हजार रुपये दंडाची तरतूद आहे.

येथील माधवनगर रोडवर 29 नोव्हेंबररोजी मोटार वाहन निरीक्षक आकाश कांबळे हे वायुवेग पथकाद्वारे रात्री वाहनांची तपासणी करीत असताना वैध कागदपत्रे नसलेले एमएच 04, जीपी 0628 हे ट्रॅव्हल्स वाहन आढळून आले. चलन जारी करत असताना वाहन रस्त्याकडेला घेण्याबाबत सूचना देऊनही चालकाने वाहन रस्त्याच्या मध्ये आडवे उभे केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या रुग्णवाहिकेस अडथळा निर्माण झाला. यामुळे रुग्णवाहिकेस पर्यायी रस्त्याने जावे लागले.

याची सखोल चौकशी करून संबंधिताना नोटीस पाठवण्यात आली. त्यानंतर मोटार वाहन कायद्यानुसार या वाहनावर 10 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. हा आदेश 12 फेब्रुवारीरोजी पारीत करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT