Child assault case Pudhari
सांगली

Child assault case: बापाने दोन चिमुरडींना उलटे टांगून मारले; एकीचा मृत्यू, तर दुसरी गंभीर जखमी

शेजाऱ्याने मुलींवर चोरीचा संशय घेतल्याने बापाने पोटच्या दोन मुलींना घरातच त्यांचे हात-पाय एकत्र बांधून मुटकुळं करून लटकवले आणि मारहाण केली

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : शेजाऱ्याने मुलींवर चोरीचा संशय घेतल्याने बापाने पोटच्या दोन मुलींना घरातच त्यांचे हात-पाय एकत्र बांधून मुटकुळं करून लटकवले आणि मारहाण केली. या घटनेत एकीचा तडफडून मृत्यू झाला, तर दुसरी गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल केले आहे. आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात ही घटना घडल्याचे बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आले.

यामध्ये सानिका यमगर (वय 10) हिचा मृत्यू झाला, तिची बहीण अनुजा (11) ही गंभीर जखमी आहे. दादू हैबत यमगर (38) असे संशयित बापाचे नाव आहे. त्याच्यासह घरातील सर्वांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. चिडलेल्या मुलींच्या बापाने माणुसकीलाच उलटे लटकवले. मुलींच्या रात्रभर चाललेल्या या अमानुष छळामुळे सानिकाने अखेर वेदनांना हार मानत प्राण सोडले, तर अनुजा जखमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT