सांगली

सांगली: बिळूर येथे विष पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या

Shambhuraj Pachindre

जत पुढारी वृत्तसेवा: बिळूर (ता.जत) येथे एका शेतकऱ्याने द्राक्ष बागेवर फवारण्यासाठी आणलेले कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. मुरग्याप्पा शंकर धोंडमणी (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. या घटनेची नोंद जत पोलिसांत झाली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बिळूर येथील शेतकरी मुरग्याप्पा धोडमणी हे शनिवारी रात्री घरी मद्यप्राशन करून  गेले होते. त्यानंतर त्यांनी द्राक्ष बागेवर फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक प्राशन केले. त्रास जाणवू लागल्याने त्यांनी आपल्या पुतण्यास कीटकनाशक पिल्याचे सांगितले. घरातील लोकांनी त्यांना जत येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तत्पूर्वी मुरग्याप्पा यांचा मृत्यू झाला. दरम्यान, यापूर्वी त्यांनी असाच प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात  पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT