मिरज : आरग (ता. मिरज) येथे वीज पडून उदय विठ्ठल माळी (वय 35) या शेतकर्याचा मृत्यू झाला. ही घटना येथील अशोकनगर परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली. दरम्यान, खटाव (ता. मिरज) येथेही वीज पडून एका म्हशीचा मृत्यू झाला. वसंत नाईक यांची ही म्हैस होती.
सांगली शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि जोरदार वार्यासह मंगळवारी सायंकाळी पावसान हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. वार्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्या. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.मिरज पूर्व भाग, तासगाव, पलूस तालुक्यात अनेक ठिकाणी गारा पडल्या.