सांगली

लय भारी!! पुढारी अ‍ॅग्री पंढरी!

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा : दैनिक 'पुढारी' माध्यम समूह आणि जिल्हा कृषी विभागातर्फे आयोजित अ‍ॅग्री पंढरी या कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्हाभरातून शेतकर्‍यांची मोठी गर्दी होत आहे. मंगळवार, दि. 19 एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पिछाडीस विजयनगर येथे सकाळी दहा ते रात्री आठवाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनाचे ऑरबीट गु्रप ऑफ कंपनीज् हे प्रायोजक आहेत. रॉनिक स्मार्ट 'दि कुटे ग्रुप' सहप्रायोजक, तर 'केसरी टूर्स' हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत.

प्रदर्शन पाहण्यासाठी सकाळपासूनच शेतकर्‍यांची गर्दी झाली. या ठिकाणी फुले, फळे, भाजीपाला तसेच विदेशी भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. प्रामुख्याने वांगे, गवारी, स्वीटकॉर्न, काकडी, कलिंगड, झुकेनी, ढबू, दोडका, घेवडा, बिन्स, कारले, मुळा, दुधीभोपळा, वरणा, विविध वाणांचा झेंडू यासह 50 पेक्षा अधिक पिकांची

लागवड करण्यात आली आहे. ड्रोनद्वारे औषध फवारणी, गांडूळ खत, खत – पाणी व्यवस्थापन, बी-बियाणे, औषधे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पाईप लाईन, शेतीपंप, सोलर पंप, शेतीविषयक पुस्तके, मल्चिंग पेपर, शेततळे कागद, ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, ब्लोअर, रोटारवेटर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, दूध काढणी यंत्र, कडबा कुट्टी, सेंद्रिय खते निर्मिती-उत्पादनांचे स्टॉल्स, बँका, पतसंस्थांचे स्टॉल
पाहण्यासाठी शेतकर्‍यांची दिवसभर गर्दी होती.

SCROLL FOR NEXT