मांजर्डे : तासगावमधील पेड गावात शिकारीसाठी सावज शोधताना बिबट्या चांगलाच अडकला. कोंबड्यांचे खुराडे दिसल्यावर त्यात तो शिरला पण कोंबड्यांनी ओरडण्यास सुरवात केली व गावकरी झाले. खुराड्यात घुसलेल्या बिबट्याला मात्र बाहेर पडण्यास वावच मिळाला नाही. इतक्यात गावकऱ्यांनी प्रसगावधान राखून खुराड्याचा दरवाजा बंद करुन घेतला. व बिबट्या खुराड्यातच अडकला .
तासगावमधील पेड गावात मध्यरात्री ही घटना घडली. कोंबड्यांची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याला ग्रामस्थाने खुराड्यात कोंडले. पेड गावातील विठ्ठलनगर येथे हा प्रकार घडला. मध्यरात्री कोंबड्यांचा आवाज येवू लागल्याने आसपासच्या ग्रामस्थांनी खुराड्याकडे जात पाहणी केली. यावेळी बिबट्या खुराड्यात आढळून आला. त्यानंतर तातडीने संबंधिताने खुराड्याचा दरवाजा बंद करून बिबट्याला कोंडले. याची वन विभागाला माहिती देण्यात आली. मध्यरात्री वन विभागाने बिबट्याला ताब्यात घेवून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. बिबट्याच्या हल्ल्यात 20 ते 25 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. l