नागजमधील वृध्द वाहनाच्या धडकेत ठार 
सांगली

Sangli Accident : नागजमधील वृध्द वाहनाच्या धडकेत ठार

एक जखमी; वाहन अनोळखी

पुढारी वृत्तसेवा

नागज : अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील संपतराव सोपान शिंदे (वय 64, रा. नागज) हे ठार झाले, तर प्रभाकर नामदेव पाटील (वय 55, रा. नागज) हे जखमी झाले. ही घटना रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील नागजजवळील रस्ता दुभाजकाजवळ रविवारी सकाळच्या सुमारास घडली.

प्रभाकर पाटील व संपतराव शिंदे हे रविवारी सकाळी मोटरसायकलवरून कर्नाटकातील चिंचली (ता. रायबाग) येथील मायाक्का देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर नागज येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या दुभाजकाजवळ त्यांच्या मोटरसायकलला भरधाव निघालेल्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. या अपघातात मोटरसायकलवरील दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संपतराव शिंदे यांना गंभीर मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर जखमी प्रभाकर पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे. अपघातानंतर वाहन चालक वाहनासह पसार झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT