सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचे स्वागत करताना आ. सुधीर गाडगीळ. यावेळी नवनाथ जाधव, शरद देशमुख, विजय साळुंखे, अमित देसाई, शुभम चव्हाण, दै. पुढारीचे निवासी संपादक सुरेश गुदले आदी उपस्थित होते. 
सांगली

Dr. Smita Jadhav| सांगलीतून डॉ. स्मिता जाधव यांना मोठे मताधिक्य मिळणार

भाजप नेत्यांचा विश्वास; सांगली, मिरजेत संपर्क दौरा, प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी बुधवारी सांगली, मिरजेत संपर्क दौरा केला. भाजपचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली. पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना निश्चितपणे मताधिक्य मिळेल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.

डॉ. स्मिता जाधव यांनी मिरज येथे आमदार सुरेश खाडे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी युवा नेते सुशांत खाडे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मिरजेतून भाजप महायुतीला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे आ. खाडे यांनी सांगितले.

सांगलीत डॉ. स्मिता जाधव यांनी आ. सुधीर गाडगीळ यांची भेट घेतली व निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. ‘पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी प्रभावी नियोजन केले आहे. सांगलीतून भाजप महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना मताधिक्य मिळेल’, असा विश्वास आ. गाडगीळ यांनी व्यक्त केला.यावेळी कोथरूड विधानसभा समन्वयक नवनाथ जाधव (नगरसेवक पुणे), सांगली महापालिकेचे स्थायी समिती सभापती अतुल माने, भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय साळुंखे, उत्तर मंडल अध्यक्ष अमित देसाई, शुभम चव्हाण व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. स्मिता जाधव यांनी माजी खासदार संजय पाटील यांचीही भेट घेतली. काका भवन येथे डॉ. स्मिता जाधव यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील आणि डॉ. पी. डी. पाटील यांच्याशी असलेले स्नेहबंध आणि ऋणानुबंध यांना उजाळा देत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोद शेडगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र वाळवेकर, मिरज पंचायत समितीचे माजी सभापती राहुल सकळे व समर्थक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप नेत्या आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांचीही डॉ. स्मिता जाधव यांनी भेट घेतली. यावेळी सोनिया होळकर, नगरसेविका रोहिणी पाटील आणि मदनभाऊ युवा मंचाचे अध्यक्ष शीतल लोंढे व कार्यकर्ते उपस्थित होते. विविध शिक्षण संस्था, भाजप पक्षसंघटना आणि मदनभाऊ युवा मंचच्या माध्यमातून पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मतदारांशी थेट संपर्क साधण्यात येत असून महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना चांगले मताधिक्य मिळेल, असा विश्वास जयश्री पाटील यांनी व्यक्त केला.

भाजप नेते व जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील यांचीही डॉ. स्मिता जाधव यांनी भेट घेतली. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली मतदार नोंदणी तसेच मतदारांशी थेट संपर्क व मिळत असलेला प्रतिसाद याची माहिती पृथ्वीराज पाटील यांनी दिली. महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना चांगले मतदान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी वीरेंद्र पाटील, ऋतुराज पाटील, विजया पाटील, प्राजक्ता पाटील, नांद्रे सोसायटीचे अध्यक्ष महावीर पाटील, अजय देशमुख, सनी धोत्रे, डॉ. राजेंद्र मेथे, डॉ. प्रताप भोसले, सतीश पाटील, एन. एम. हुल्याळकर, बाळासाहेब गुरव, वैभव गुरव उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT