डॉ. स्मिताताई जाधव यांचे राजारामबापूंना अभिवादन 
सांगली

Dr. Smita Jadhav : डॉ. स्मिताताई जाधव यांचे राजारामबापूंना अभिवादन

पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या प्रचाराला वेग

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप व महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

शैक्षणिक विश्वातील गेल्या अडीच दशकांच्या समृद्ध अनुभवाच्या जोरावर डॉ. स्मिताताई जाधव पदवीधरांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी रिंगणात उतरल्या आहेत. पदवीधरांचे प्रलंबित प्रश्न, रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासासाठी त्यांनी स्वतंत्र कृती आराखडा तयार केला असून, त्यादृष्टीने त्यांनी आपला प्रचार गतिमान केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT