बालिकेवर बलात्कारप्रकरणी नराधमास फाशी 
सांगली

Sangli Crime : बालिकेवर बलात्कारप्रकरणी नराधमास फाशी

करजगी येथील दीड वर्षापूर्वीची घटना; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

पुढारी वृत्तसेवा

सांगली : चारवर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा खून केल्याबद्दल पांडुरंग सोमन्ना कळ्ळी (वय ४५, रा. करजगी, ता. जत) याला जिल्हा सत्रन्यायाधीश श्रीमती जे. ए. मोहंती यांनी फाशीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले, तर सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी १३ दिवसांत तपास पूर्ण केला.

दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पीडित मुलगी झाडाखाली खेळत बसली होती. याचा गैरफायदा घेत आरोपीने पीडित बालिकेला जबरदस्तीने आपल्या घरी नेले. बलात्कार करून क्रूरपणे तिचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पीडित मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मृतदेह पोत्यात भरून घरातील लोखंडी पेटीत झाकून ठेवला. शाळेची वेळ झाली तरी मुलगी घरी आली नाही, म्हणून घरच्यांनी तिची चौकशी सुरू केली. त्यावेळी मुलीला आरोपीने जबरदस्तीने घरात नेत असल्याचे एकाने पाहिल्याचे समजले. यानंतर या घटनेचा उलगडा झाला. कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना, परिस्थितीजन्य पुराव्यावरून न्यायालयाने शिक्षा सुनावली. खटल्यात मूळ फिर्यादीच्या वतीने ॲड. तोफिक जमादार यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT