सांगली

Miraj Dance Bar Raid: म्हैसाळ-विजयनगरात डान्सबारचा पर्दाफाश

कोल्हापुरातील पाच बारबालांसह 10 जणांवर कारवाई; डीजेच्या तालावर दारूच्या नशेत धिंगाणा

पुढारी वृत्तसेवा

मिरज : विजयनगर-म्हैसाळ (ता. मिरज) येथील राही पॅलेस बारमध्ये सुरू असणाऱ्या डान्सबारचा पर्दाफाश करण्यात आला. यावेळी तेथे डीजेच्या तालावर दारूच्या नशेत बेधुंद व तोकड्या कपड्यात अश्लील नृत्य करणाऱ्या कोल्हापूरमधील पाच बारबालांसह पाच ग्राहकांवर कारवाई केली. यावेळी पोलिसांनी डीजे सिस्टीम, मोबाईलसह दोन लाख 6 हजार 620 रुपयांची रोकड जप्त केली.

याप्रकरणी पाच बारबालांसह राही पॅलेसचा मॅनेजर स्वप्निल राजकुमार कोरे (वय 32, रा. उदगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), ग्राहक अमित सुरेश गोरड (30), बापू आबासाहेब मासाळ (25, दोघे रा. नांगोळे, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), मिथुन शंकर कोळेकर (31, रा. रांजणी, ता. कवठेमहांकाळ) आणि चंद्रकांत नेताजी माने (39, रा. रांजणी, ता. कमठेमहांकाळ, जि. सांगली) यांचा समावेश आहे.

या बारमध्ये मॅनेजर कोरे याने कोल्हापूर जिल्ह्यातील काही एजंटांच्या माध्यमातून बारबाला आणल्या होत्या. त्यांचा बारमध्ये अश्लील डान्स सुरू असल्याची माहिती मिरज उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या विशेष पथकासह बारवर छापा टाकला. त्यावेळी दारूच्या नशेत पाच बारबाला या अत्यंत तोकड्या कपड्यात, अश्लील हावभाव करत ग्राहकांसोबत लगट करत नाच करीत असल्याचे दिसून आले.

पोलिसांचा छापा पडताच बारबालांसह एजंट व ग्राहकांची एकच धावपळ उडाली. बारबालांसह ग्राहकांकडे पोलिसांच्या पथकाने चौकशी केली असता, त्या बारबाला कोल्हापूरमधील असून, एजंटामार्फत या बारमध्ये आल्याचे समोर आले. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली ही कारवाई मंगळवारी पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होती.

कोल्हापूरमध्येही डान्सबार?

कोल्हापुरातील या बारबाला मागणीनुसार पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळ्या बारमध्ये जाऊन सेवा देतात. परंतु, छापा पडताच बारबालांच्या एजंटांनी बारजवळ गर्दी केली होती. ते सर्वजण कोल्हापूरमधील होते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील काही बारमध्येही छमछम सुरू असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT