Sangli Accident News 
सांगली

Sangli Accident : डफळापुरात अपघातात तरुण जागीच ठार

बस नाल्यात जाऊन आदळली

पुढारी वृत्तसेवा

जत : जत - सांगली रस्त्यावर डफळापूरपासून दोन किलोमीटरवर एसटी व मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकलचालक शिरीष नामदेव जाधव (वय 23, रा. खलाटी, ता. जत) हा जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली,

डफळापूरपासून दोन किलोमीटरवर व्यंकटेश पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून मोटरसायकल (एमएच 10 एजे 3347 )वरून शिरीष रस्ता ओलांडून खलाटीकडे जात होता. यावेळी जतवरून आलेली जत- इचलकरंजी एसटी (एमएच 10 डीटी 3961) ची समोरासमोर धडक झाली. एसटीमध्ये चाळीस प्रवासी होते, यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात इतका भीषण होता, की एसटीने मोटरसायकल सुमारे 100 फूट फरफटत नेली होती. मोटरसायकलचे तुकडे तुकडे झाले. अपघातात शिरीष हा एसटीच्या पुढील चाकाच्या वरच्या बाजूला अडकला होता, एसटी उजव्या बाजूला नाल्यात जाऊन आदळली. मोटरसायकल एसटीच्या खाली दबली गेली.

मोठा अनर्थ टळला...

पंधरा फूट अंतरावर विजेचा ट्रान्स्फॉर्मर आहे, विजेच्या खांबावर गाडी आदळली असती तर मोठा अनर्थ घडला असता, अशी घटनास्थळी चर्चा होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT