आटपाडीत पुतळा हटवल्यानंतर रास्ता रोको करणार्‍यांवर गुन्हा  file photo
सांगली

आटपाडीत पुतळा हटवल्यानंतर रास्ता रोको करणार्‍यांवर गुन्हा

बेकायदा जमाव ः 67 ते 72 जणांविरोधात पोलिसात तक्रार

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : आटपाडी येथील सांगोला चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बेकायदेशीररित्या बसवण्यात आलेला पुतळा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतला. यानंतर 67 ते 72 पुरुष व महिला आंदोलकांनी विनापरवाना बेकायदा जमाव जमवून रविवारी पहाटे 5.30 ते सकाळी 11 दरम्यान रास्ता रोको आंदोलन केले. या सर्वांवर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक सागर खाडे यांनी फिर्याद दिली आहे.

आटपाडी, सांगोला आणि माळशिरस तालुक्यातील आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साधू खरात, अरुण किसन वाघमारे, राजेंद्र साधू खरात, शैलेश बबन ऐवळे, सनी भानुदास कदम, करण अर्जुन कदम, सिद्धनाथ मारुती तोरणे, शेखर महादेव खरात, गणेश चंद्रकांत पवार, किसन वाघमारे, रणजित मुरलीधर ऐवळे, समाधान बाबा खरात, नामदेव भीमराव खरात, विवेक भागवत सावंत, दादासाहेब रामचंद्र कदम, सुयश कदम, दुर्योधन जावीर, सूृरज चंद्रकांत पवार, रोहित रमेश चंदनशिवे, विनोद ऐवळे, आबासाहेब ऐवळे, बाबासाहेब वाघमारे, सुशीलकुमार मोटे, नंदकुमार कदम, बाबू मोटे, साहेबराव चंदनशिवे, भिकाजी खरात, अमित वाघमारे, अमित ऐवळे, अमर मोटे, मोहन खरात, दत्तात्रय ऐवळे, सोमनाथ तोरणे, शुभम सरतापे, सुहास खरात, सूर्यकांत खरात, महेश ऐवळे, ताजुद्दीन झारी, सोमनाथ ऐवळे, मारूती ढोबळे, विशाल काटे, नामदेव खरात, विनायक ऐवळे, किशोर लांडगे, महेश चव्हाण, अविनाश रणदिवे, आकाश तोरणे, सुष्मिता सुरेश मोटे, सुशीला भिसे व अनोळखी 20 ते 25 पुरुष व महिला, अशा 67 ते 72 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तणाव निवळला, पण बंदोबस्त कायम

आटपाडी शहरात शनिवारी पहाटे सांगोला रस्ता चौकात विनापरवाना बसविलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी पहाटे हटवला. यानंतर दुपारी भीमसैनिकांनी तेथे पुन्हा नवीन पुतळा बसवला. या घडामोडीनंतर तणाव अंशतः निवळला आहे. परंतु तणाव पूर्ण निवळला नसल्याने दंगल नियंत्रण पथक आणि पोलिस बंदोबस्त कायम आहे. सोमवारी दिवसभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर महिला कार्यकर्त्या दिवसभर बसून होत्या. बौद्ध भिक्खूंनी पुतळ्याचे दर्शन घेत प्रार्थना केली. दरम्यान पुतळा हटवल्यानंतर रास्ता रोको करणार्‍या 67 ते 72 कार्यकर्त्यांवर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शासनाने सर्वसंमतीने शहरात जागा उपलब्ध करून द्यावी. पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांनी जागेचा निर्णय घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला जावा, अशी भूमिका जाहीर केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT