Cyber Crime pudhari photo
सांगली

Sangli News : सायबर फसवणुकीतील रक्कम परत करण्याचे न्यायालयाचे आदेश

दोन लाख २९ हजार ५८१ रुपये मिळणार

पुढारी वृत्तसेवा

सांगली : ऑनलाईन सायबर फसवणूक प्रकरणातील सांगली येथील उद्योगपती पांडुरंग वामन खरे यांची फसवणूक झालेली रक्कम रुपये २ लाख २९ हजार ५८१ रुपये त्यांना परत करण्याचे आदेश सांगली येथील प्रथमवर्ग न्यायाधीश श्रीमती मानसी खासनीस यांनी दिले. फिर्यादी यांच्या वतीने ॲड. विक्रांत वडेर व ॲड. सुयश लालवाणी यांनी काम बघितले.

पांडुरंग खरे यांनी २ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांच्या कुटुंबीयांसाठी इंटरनेटवरून शेगाव येथील श्री गजानन महाराज यांच्या देवदर्शनासाठी गजानन महाराज संस्थानचे १२ हजार ४५० रुपये भरून रूम बुक केली होती. त्यानंतर खरे यांनी सदरची रक्कम ट्रान्सफर करून निश्चिती करण्यासाठी फोन केला असता त्यांना रक्कम रुपये १२,४००/- वेगळे व रक्कम रुपये ५०/- वेगळे असे ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्याप्रमाणे रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आधीची रक्कम परत पाठवू असे आश्वासन दिले. त्यामुळे खरे यांनी पुन्हा त्यांच्या सांगण्याप्रमाणे यूपीआय द्वारे रक्कम रुपये १२,४००/- व ५०/- पाठवून निश्चितीकरणासाठी फोन केले व आधीची रक्कम परत मागितली असता समोरील व्यक्तींनी खरे यांचा विश्वास संपादन करून त्यांना युपीआय द्वारे रक्कम रुपये ३९,०८१ रूुपये -, ५१,५३१ रुपये ४८,१११ रुपये ९०,६१२ रुपये-, २,२९,३३५ रुपये- इतक्या रक्कमा ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.

परंतु एक रुपयाही परत पाठवला नाही. खरे यांच्या लक्षात आले की आपली समोरील व्यक्ती फसवणूक करत आहेत. त्यामुळे खरे यांनी तातडीने सायबर फ्रॉडची तक्रार नोंदवली. तपासाअंती पोलिसांनी फसवणूक केलेल्‍या व्यक्तीच्या अकौंटवरील खरे यांची २ लाख २९ हजार ५८१ इतकी रक्कम फसवणूक करणाऱ्याच्या बँक खात्यावरून फ्रिज केली. याबाबत फिर्यादीच्या वकिलांनी कशाप्रकारे खरे यांची फसवणूक झाली हे न्यायालयापुढे स्पष्ट केले. यावर न्यायालयाने हजर केलेली कागदपत्रे व वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून पांडुरंग खरे यांना सदरची रक्कम परत देण्याबाबत आदेश दिले. पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव, सायबर विभागाचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल मण्णीकेरी, कॉन्स्टेबल रोहित चौगुले व महिला पोलिस पूजा जगदाळे यांनी मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT