पलूस : येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात डॉ. स्मिताताई जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदीप कदम, अमीर पठाण आदी उपस्थित होते.  
सांगली

Dr. Smita Jadhav : पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : डॉ. स्मिताताई जाधव

पलूस येथे राष्ट्रवादी अजित पवार गट कार्यालयासमोर पदवीधरांना मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

पलूस : पुणे पदवीधर मतदारसंघातील पदवीधरांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील पदवीधरांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर आपला भर राहील, असा विश्वास पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांनी व्यक्त केला.

पलूस येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांच्याहस्ते डॉ. स्मिताताई जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. जाधव म्हणाल्या, पुणे पदवीधर मतदारसंघाचा भौगोलिक विस्तार मोठा असल्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे हे आव्हान आहे. मात्र महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते समन्वयाने प्रचार यंत्रणा राबवत आहेत. पलूस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यामुळे प्रचाराला मोठे बळ मिळाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम म्हणाले, डॉ. स्मिताताई जाधव यांना शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. या अनुभवाचा उपयोग पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि शिक्षण व उद्योग क्षेत्रात समन्वय साधण्यासाठी निश्चितच होईल. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून डॉ. जाधव यांना विजयी करावे.

यावेळी अमीर पठाण, विशाल पंढरे, राहुल पाटील, कुलदीप वारे, महेश हजारे, नितीन माने, विकास तावदर, भास्कर संकपाळ, सागर कदम, शहानवाज डांगे, आशिष सूर्यवंशी, तुषार सूर्यवंशी, अभिजित कौलगे, निवास गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT