Sangli News: जनरेटरअभावी शासकीय रुग्णालयात अंधार Pudhari Photo
सांगली

Sangli News: जनरेटरअभावी शासकीय रुग्णालयात अंधार

सिटी स्कॅन, एक्स-रे मशीन बंद; प्रत्येक मंगळवारी प्रकार, आरोग्याशी खेळ

पुढारी वृत्तसेवा

सांगली : येथील शासकीय रुग्णालयामधील विद्युत पुरवठा बंद पडल्यामुळे एक्स-रे, सिटी स्कॅन मशीन बंद ठेवावे लागत आहे. यामुळे दिवसभर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक ताटकळत थांबत आहेत. जनरेटर नसल्यामुळे प्रत्येक मंगळवारी हा प्रकार होत आहे. यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ होत आहे.

शासकीय रुग्णालयामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे, त्याचबरोबर जनरेटर नसल्यामुळे मंगळवारी दिवसभर एक्स-रे विभाग व सिटी स्कॅन मशीन बंद राहिले. त्यामुळे आकस्मिक विभागात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सकाळी आठ वाजल्यापासून रांगेत थांबावे लागले. सर्व साधने नादुरुस्त असल्यामुळे रुग्णांची हेळसांड झाली. आयसीयु वगळता जवळपास सर्वच शासकीय रुग्णालयात अंधार होता. शल्यचिकित्सक विभाग, औषध वैद्यकशास्त्र विभागात अंधार असल्याने वैद्यकीय अहवाल तपासता येत नसल्यामुळे अनेक रुग्ण ताटकळत थांबल्याचे दिसून आले.

यावेळी वैद्यकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रशासकीय बैठकीसाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले शासकीय रुग्णालयाचे कामकाज गेल्या वर्षभरपासून एका जनरेटरवर सुरू आहे. प्रत्येक मंगळवारी विद्युत पुरवठा खंडित असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT