विटा : पुढारी वृत्तसेवा
विट्यातील शासकीय निवासी शाळेतील 24 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांना तातडीनं विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.
समाजकल्याण विभागाच्या विटयातील शासकीय निवासी शाळेत विद्यार्थी सुरज प्रकाश जाधव (वय 16), श्रवणकुमार विठ्ठल बागडे (वय 17), सुरज किसन साठे (वय 15), आदित्य आनंदा रोकडे (वय 16), निर्मल किशोर सावंत (वय 14), स्मित सुभाष झिमरे (वय 12), योगेश बिरुदेव मोटे (वय 13), शुभम प्रकाश माळवे (वय 14), हर्षवर्धन सुनील गायकवाड (वय 13), तेजस सचिन काटे (वय 15), आदित्य कैलास लोखंडे (वय 16), आरूष संजय सकट (वय 12), यश विजय सकट (वय 12), श्रीवर्धन प्रवीण माने (वय 11), प्रज्वल शशिकांत शिंदे (वय 16), सिद्धार्थ जित्ताप्पा बनसोडे (वय 13), आयुष नामदेव सावंत (वय 13), तन्मय प्रकाश निकाळजे (वय 14), सक्षम दिनकर सुखदेव (वय 14), संदीप सुदर्शन नातपुते (वय 14), प्रणव सुर्यकांत उबाळे (वय 16), अभिषेक गौतम डोळसे (वय 12), चैतन्य शशिकांत शिंदे (वय 12), सक्षम तानाजी चंदनशिवे (वय 12) या 24 मुलांवर सध्या विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान सांगलीचे जिल्हा डॉ. विक्रमसिंह कदम यांनी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा अलर्ट केली आहे. आसपासच्या रुग्णालयातील तसेच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि बालरोग तज्ञांना ग्रामीण रुग्णालयाकडे जाऊन आवश्यकते उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच विट्यातील संबंधित शासकीय वसतीगृहात एकूण 93 पैकी ज्या 24 जणांना विषबाधा झाली आहे असे सोडून इतरांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक पाठवले आहे.
दरम्यान सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी संबंधित घटनेबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले असून प्राधिकारी डॉ बांदल आणि गटविकास अधिकारी पाटील यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.