Electric Shock Pudhari
सांगली

Sangli Electric Shock: हरिपूर येथे विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथे चार वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. बुधवार, दि. १ जुलै रोजी रात्री ही घटना घडली. श्रीवर्धन रायाप्पा चटर्जी (वय ४ वर्षे, रा. पिंगळे मळा, हरिपूर) असे मृत मुलाचे नाव आहे.

चटर्जी यांच्या घराशेजारी राहणाऱ्या कुटुंबात बुधवारी सांस्कृतिक कार्यक्रम होता. त्यासाठी घरासमोर मंडप घातला होता. या मंडपासाठी लोखंडी पाईपचा वापर करण्यात आला होता. कार्यक्रम झाल्यानंतर चटर्जी कुटुंबीय रात्री अकराच्या सुमारास घरी परतले. गाडीतून उतरल्यानंतर श्रीवर्धन याने मंडपासाठी उभारलेल्या लोखंडी खांबाला हात लावला.

मंडपाच्या लोखंडी पाईपचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने खांबामध्ये विजेचा प्रवाह सुरू होता. यामुळे विजेचा तीव्र धक्का लागून श्रीवर्धन याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT