Garbage is stuck in Chikurde Dam.
ऐतवडे बुद्रुक : चिकुर्डे बंधार्‍यामध्ये कचरा अडकला आहे.  Pudhari file Photo
सांगली

वारणा नदीवरील चिकुर्डे बंधारा तुंबला

पुढारी वृत्तसेवा

ऐतवडे बुद्रुक, पुढारी वृत्तसेवा :पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. चिकुर्डे (ता. वाळवा) येथील वारणा नदीवरील बंधार्‍यामधील दरवाजांमध्ये वाहून आलेला पालापाचोळा, कचरा अडकला आहे. त्यामुळे बंधार्‍याला धोका निर्माण झाला आहे.संबंधित विभागाचे ऐन पावसाळ्यातच याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तत्काळ काम मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.

चांदोली पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा बंधार्‍यात अडकला आहे. त्यामुळे बंधार्‍याचे दरवाजे तुंबले आहेत. पाण्याची फूग वाढल्याने ते पाणी काठावरील शेतात शिरत आहे. त्यामुळे जमिनी खचण्याची भीती आहे. पावसाचे प्रमाण वाढत असल्याने पाण्याचा दाब वाढतो आहे. महापुरावेळी बंधार्‍यामध्ये कचरा अडकल्याने पाणी पात्राबाहेर जाऊन जमिनी, रस्ते खचले होते. आता, संबंधित विभागाने कचरा काढून बंधारा वाहता करण्याची मागणी होत आहे.

चिकुर्डे बंधार्‍यातील लाकडी बरगे पावसाळ्यापूर्वीच काढणे गरजेचे होते. पण बरगे काढले नाहीत. बंधार्‍यामध्ये पालापाचोळा मोठ्या प्रमाणात अडकला आहे. बंधार्‍याला धोका निर्माण होऊ शकतो.
शहाजी भोसले, चिकुर्डे
SCROLL FOR NEXT